Devendra Fadnavis Interview : नुकतीच बॅालीवूड अभिनेता अक्षय कुमारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने राजकीय घडामोडींसह सिनेसृष्टीतील आवडीविषयी सीएम फडणवीसांना बोलतं केलं. मुलाखतीत अक्षय कुमारने विचारलेल्या प्रश्नांची देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास उत्तरं दिली. मुलाखतीच्या सुरूवातीलाच अक्षय कुमारने असा प्रश्न विचारला अन् फडणवीसांनी एक आठवण शेअर केली. या मुलाखतीत अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमचा आवडता चित्रपट कोणता? एक पॉलिटिक्स म्हणून कोणता चित्रपट तुम्ही स्वत:ला रिलेट करता? जर तुम्ही एका दिवसासाठी सिनेमाचा दिग्दर्शक झालात आणि त्या सिनेमाच नाव महाराष्ट्र असेल तर तुम्ही पहिला सीन कोणता घ्याल. असे प्रश्न मुलाखतीच्या सुरुवातीलाच केले. या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांच्या नायक या सिनेमाचा दाखल देत एक आठवण शेअर केली. ते म्हणाले मी स्वत:ला नायक सिनेमाची रिलेट करतो. कारण त्या चित्रपटाने मला अडचणीत आणलं होतं. कारण मी कुठेही गेलो की, लोक पहिल्यांदा मला हा प्रश्न विचारतात की, त्या नायक चित्रपटातील अनिल कपूर सारखं काम करा ना. त्यावर मला काय बोलावं हे कळत नाही. असं फडणवीसांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले नायक चित्रपटाने खूप प्रभावित केलं. एका दिवसासाठी दिग्दर्शक झालात तर या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिनेमाचा पहिला सीन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक असेल तसंच महाराजांचं स्वराज्य सिनेमात पहायला मिळेल, असं त्यांनी सांगितलं. अभिनेता अक्षय कुमार याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे. हेही वाचा : सोन्याचा नवा रेकॉर्ड! आजची किंमत पाहून मगच करा खरेदी… ; वाचा आजचा ‘विक्रमी भाव’