भारतीय मुस्लीम जगात सर्वाधिक समाधानी
Updated On:

मुंबई – जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले,’मुघल सम्राट अकबराविरुद्ध महाराणा प्रताप यांचे सैन्य लढले, त्यामध्ये अनेक मुस्लिमांचा समावेश होता. देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात, असे भागवत यांनी सूचित केले.
भारताने अन्य धर्मीय अनुयायांना हक्क दिले, तसे पाकिस्तानने दिले नाहीत आणि मुस्लीमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला, असेही भागवत यांनी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.





