नवी दिल्ली – प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबा यांनी आपण पतंजली संस्थेच्या माध्यमातून कोरोना विषाणूवर प्रभावी आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा काल केला होता. मात्र रामदेव बाबांच्या या दाव्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आयुष मंत्रालयातर्फे या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती. याबाबत आज आयुष्य मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी, ‘औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच रामदेव बाबांच्या ‘कोरोनील’ औषधाला परवानगी देण्यात येईल’ अशी माहिती दिली.
तत्पूर्वी काल आयुष मंत्रालयातर्फे पतंजलीने कोरोनावरील कथित औषध असलेल्या ‘कोरोनील’बाबत जे दावे केले आहेत त्यांची पडताळणी पूर्ण होईपर्यंत ‘दिशाभूल’ करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करू नका असे आदेश दिले आहेत. सध्या आयुष मंत्रालयातर्फे रामदेव बाबांच्या पतंजलीला औषधातील घटकांची माहिती देण्याची सूचना करण्यात आली.
It’s a good thing that Baba Ramdev has given a new medicine to the country but as per rule,it has to come to AYUSH Ministry first.They even said that they have sent a report. We’ll look into it&permission will be given after seeing the report: Shripad Naik,AYUSH Minister #COVID19 pic.twitter.com/SYJH5RroAt
— ANI (@ANI) June 24, 2020
“बाबा रामदेव यांनी देशाला एक नवीन औषध दिले ही एक चांगली बाब आहे. मात्र नियमांनुसार त्यांनी सर्वप्रथम आयुष मंत्रालयाकडे याबाबतची माहिती सुपूर्द करायला हवी होती. आता पतंजलीने मंत्रालयाला रिपोर्ट पाठवले आहेत. नियमांप्रमाणे पतंजलीने पाठवलेल्या रिपोर्ट्सची शहानिशा केल्यानंतरच कोरोनील औषधाला परवानगी देऊ’ असे मंत्री नाईक यांनी सांगितले.