महाविकास आघाडीचे मंत्री जोमाने काम करतील – जयंत पाटील
Updated On:

धुळे : महाविकास आघाडीने सगळ्यांना सामान खाते वाटप केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉग्रेसचे मंत्री जोमाने काम करतील, महाआघाडी सरकारमध्ये कोणीही नाराज नाहीत. सरकारमध्ये फूट पाडण्यासाठी विरोधक असे वक्तव्य करीत असतात असे जयंत पाटील यांनी धुळ्यात सांगितले. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रचारासाठी मंत्री धुळ्यात आले होते.
‘मातोश्री’वर जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या विषयी बोलताना मंत्री म्हणाले, मुख्यमंत्रीच्या सुरक्षेच्या कारणास्तव शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते.




