नगर – रेल्वे स्टेशन परिसरात एक लाख रुपयाची रक्कम असलेली छोटी हॅंडबॅग दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला. ही घटना रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का येथे घटना घडली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिराज इस्माईल खान (रा. मेहराज मशिदीजवळ, दर्गादायरा रोड, मुकुंदनगर) यांचे रेल्वे मालधक्कासमोर ऑफिस आहे. ते एक लाख रुपयांची रक्कम असलेली छोटी हॅंडबॅग बगलेत घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बगलेतील पैसे असलेली बॅग बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सिराज खान यांच्या फिर्यादीवरून दोन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ हे करीत आहेत.