“राजीनामा दिला म्हणून विषय संपत नाही, त्यांना सहआरोपी करून…”; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Updated On:
“राजीनामा दिला म्हणून विषय संपत नाही, त्यांना सहआरोपी करून…”; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar On Dhananjay Munde | बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. या प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला.

यातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?  

“धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा सामान्य लोकांच्या मनातील संतापाच्या उद्रेकाचा आणि देशमुख कुटुंबाच्या संघर्षाचा परिणाम आहे. पण केवळ राजीनामा दिला म्हणून हा विषय इथंच संपत नाही, तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची आणि सुधारित चार्जशीट दाखल करण्याची गरज आहे. तरच संतोष देशमुख यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. त्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू,” असे रोहित पवार म्हणाले.  Rohit Pawar On Dhananjay Munde |

“जे फोटो काल समोर आले त्यानंतर लोक भावनिक झाली. यामुळे सरकारला झुकावं लागलं. हे फक्त सर्वसामान्य लोकं आणि देशमुख परिवाराने जो लढा लढला यामुळे झाले. सरकारने याचं क्रेडिट घेऊ नये. तसेच धनंजय मुंडेंनीही याचं क्रेडिट घेऊ नये की मी नैतिकता म्हणून राजीनामा देतो. कारण तीन महिने तुम्ही फक्त टाईमपास केला, अंहकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला हे खरं आहे,” असेही रोहित पवार म्हणाले.

देशमुख कुटुंबाची आणि सर्वसामान्यांची अजून एक मागणी आहे की धनंजय मुंडे यांना सहआरोपी करायला हवं. कारण त्या कंपनीकडून पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती, असं भाजपचा आमदार पुराव्यासह जर म्हणत असेल तर मग सहआरोपी करुन पारदर्शकपणे याची चौकशी होणं महत्त्वाचे असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. तर भाजप नेते सुरेश धस यांनीही सातपुड्याच्या बंगल्यावर खंडणीसाठी भेट झाली की नाही याचं उत्तर धनंजय मुंडेंना द्यावंच लागेल, असे म्हंटले आहे.
Rohit Pawar On Dhananjay Munde |

हेही वाचा: 

Jitendra Awhad : सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते; आव्हाडांचा गंभीर आरोप, ट्वीटद्वारे सुनावले खडेबोल

आणखी संबंधित बातम्या

Baramati News : आईसोबत भांडण अन् घरातून बाहेर पडताच... आमदाराच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

2026-08-23 11:51:09

Baramati News : आईसोबत भांडण अन् घरातून बाहेर पडताच... आमदाराच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

Rohit Pawar : कर्जत व जामखेडमधील उपजिल्हा रुग्णालये कार्यान्वित करा; रोहित पवार यांची मागणी

2026-08-18 21:03:37

Rohit Pawar : कर्जत व जामखेडमधील उपजिल्हा रुग्णालये कार्यान्वित करा; रोहित पवार यांची मागणी

Pankaja Munde : आधी म्हणाल्या रिटायर्ड व्हावंसं वाटतं, आता पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; मोठा इशारा देत नेमकं काय म्हणाल्या?

2026-08-18 07:57:09

Pankaja Munde : आधी म्हणाल्या रिटायर्ड व्हावंसं वाटतं, आता पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; मोठा इशारा देत नेमकं काय म्हणाल्या?

Rohit Pawar : दोन कोटींहून अधिक एसआयआर अर्ज अनुपलब्ध; रोहित पवारांचा आक्षेप

2026-08-17 17:50:32

Rohit Pawar : दोन कोटींहून अधिक एसआयआर अर्ज अनुपलब्ध; रोहित पवारांचा आक्षेप

Navnath Waghmare: "ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुले, पैसा दिसले की...", मराठा समाजाच्या मुलींबाबत नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान

2026-08-17 11:29:18

Navnath Waghmare: "ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुले, पैसा दिसले की...", मराठा समाजाच्या मुलींबाबत नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान