पारगाव शिंगवे – फुलवडे (ता. आंबेगाव) येथील श्रीरंग वि. गभाले मराठी विद्यालयातील प्रथमेश शंकर नंदकर या विद्यार्थ्याने बनविलेल्या गणितीय प्रतिकृती प्रकल्पास जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.
या प्रकल्पालाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विज्ञान अध्यापक संघ यांच्यावतीने गणेश इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांला शिक्षक रमेश काशिनाथ ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी मुख्याध्यापक निंबाळकर, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रथमेशचा सत्कार केला. औदुंबरेश्वर आदिवासी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा श्रीरंग गभाले, सचिव चिंतामण भारमळ, खजिनदार विजय गभाले, सरपंच मनीषा संदीप नंदकर यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.