मराठमोळ्या अभिनेत्याने गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर सुरु केला नवा व्यवसाय

Prasad Limaye | देशभरात गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. अनेकजण गणेश चतुर्थीच्या दिवशी नव्या कार्याची सुरुवात करतात. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील एका कलाकाराने देखील व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
या मालिकेत खलनायकाचं पात्र साकारणारा अभिनेता प्रसाद लिमयेने गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्याने स्वत:चं ‘अन्नपूर्णा’ हे क्लाउड किचन सुरु केलं आहे. ‘जगात खाण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि तोच आनंद द्विगुणीत करायला आम्ही घेऊन येत आहोत खास ठाणेकरांसाठी “अन्नपुर्णा” ची मेजवानी!!’ असं कॅप्शन त्याने दिलं आहे. अभिनेत्याने ठाण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. Prasad Limaye |
View this post on Instagram
अभिनेता प्रसाद लिमये आता अभिनयाचं काम सांभाळत व्यवसाय देखील करणार आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रसादने हॉटेल व्यवसाय पाऊल ठेवलं आहे. ‘अन्नपूर्णा’ असं प्रसादच्या हॉटेलचं नाव आहे. नुकताच एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. Prasad Limaye |
प्रसाद लिमयेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. याशिवाय तो ‘बेधडक’, ‘व्हॉट्सअॅप लग्न’,’दगडी चाळ, ‘मोगरा फुलला’, ‘फतेशिकस्त’ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला. सध्या तो ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत किशोर जहागिरदार हे खलनायकाचं पात्र साकारत आहे.
हेही वाचा:
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेत बदल; राज्य सरकारचा निर्णय





