आंबेठाणचा कारभार पती-पत्नीच्या हाती

लोकनियुक्त सरपंच संघमित्रा नाईकनवरे : उपसरपंचपदी दत्तात्रेय नाईकनवरे
आंबेठाण – आंबेठाण (ता. खेड) ग्रामपंचायतचा कारभार आता पती-पत्नीच्या हाती आला आहे. आंबेठाण ग्रामपंचायतीच्या सरपंच संघमित्रा नाईकनवरे या यापूर्वीच लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड आल्या आहेत. तर आता त्यांचे पती दत्तात्रेय नाईकनवरे यांची उपसरपंच म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे.
सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून तुळजाबाई घाटे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी दत्तात्रय पांडुरंग नाईकनवरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. ही निवडणूक ग्रामविकास अधिकारी रवींद्र उगले यांच्या प्रशासकीय कामकाजामध्ये झाली.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक सुभाष मांडेकर, माजी सरपंच गणेश मांडेकर, शरद मांडेकर, बबन घाटे, भानुदास दवणे, दत्तात्रय चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. याप्रसंगी सभागृहात माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर, शांताराम चव्हाण, अमोल दवणे, लक्ष्मण भालेराव, रूपाली गोंडे, अहिल्याबाई पडवळ, रुपाली मांडेकर, आरती आरगडे, ज्योती मांडेकर आदी उपस्थित होते.





