Owaisi allegations against Ajit Pawar | महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने प्रचार सभांना वेग आला आहे. त्याअनुषंगाने नेतेमंडळी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या आरोप-प्रत्यारोपाचे देखील फैरी सुरू झाले आहेत. याचदरम्यान, काल लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. अजित पवार शरद पवारांचे झाले नाही तर… ओवेसी म्हणाले, “अजित पवार तुम्ही शरद पवारांचे झाले नाही तर तुम्ही नांदेडचे कसे होताल? अजित पवार यांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचा आणि ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास तोडला आहे. ज्या माणसाने तुम्हाला वाढवले, तुम्हाला स्थान दिले आणि तुमचा आदर केला, त्याला तुम्ही घरी सोडून पुढे गेलात. ही अजित पवारांची ओळख आहे. मुस्लिम नाव असते तर ७५ वर्षे तुरुंगात झाला असता घोटाळ्याच्या आरोपांबाबतही ओवैसी यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. ओवैसींनी म्हटले की, “तुम्ही स्वतः उभे राहून म्हणता की तुमच्यावर ७५,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. काय झाले? हो, अजित पवार, तुमचे नाव अजित पवार आहे. अजित पवारांच्या जागी मुस्लिम नाव असते तर ७५ वर्षे तुरुंगात झाला असता. सत्तेत असणारे लोक आपल्या पदाचा फायदा घेतात, तर साध्या मुस्लिमाला कोणतीही सुरक्षा नाही. सत्तेत असलेल्या आणि अत्याचारित मुस्लिमांमध्ये हाच फरक आहे.” Owaisi allegations against Ajit Pawar | शरद पवारांकडे आवश्यक संख्याबळ नाही याशिवाय ओवैसी यांनी शरद पवारांच्या राज्यसभेत जाण्यावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, “पवारांकडे आवश्यक संख्याबळ नाही आणि त्यांच्या आघाडीसाठी पुरेसे आमदार नाहीत. जर शरद पवार पुन्हा राज्यसभेत गेले तरच त्यांच्या समर्थकांची संख्या कळेल. त्यांच्या मते, या प्रकरणात जनतेला तमाशा बघायला मिळेल आणि काहीही नाही.” दरम्यान, ओवैसी यांच्या आरोपांमुळे निवडणुकीचे वातावरण आणखी तापले आहे. Owaisi allegations against Ajit Pawar | हेही वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते’; भाजपच्या नेत्याच्या वक्तव्याने घमासान