कार्यकर्तेच भाजपची खरी ताकद-
\n
\nबंगालमधील विजयाचे श्रेय पंतप्रधानांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यांनी म्हटले की, “हा ऐतिहासिक विजय पिढ्यानपिढ्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांशिवाय आणि संघर्षाशिवाय शक्य नव्हता. अनेक वर्षांपासून त्यांनी जमिनी स्तरावर कष्ट घेतले, प्रत्येक संकटाचा सामना केला आणि आमचा विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवला. हे कार्यकर्तेच भाजपची खरी ताकद आहेत.”
\n\n\nBJP’s record win in West Bengal would not be possible without the efforts and struggles of countless Karyakartas over generations. I salute them all. For years, they have worked hard on the ground, overcome all sorts of adversities and spoken about our development agenda. They…
\n— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2026
आसाममध्ये पुन्हा ‘एनडीए’ सरकार –
\n
\nआसाममधील विजयावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, आसामच्या जनतेने पुन्हा एकदा भाजप-एनडीए युतीवर विश्वास दाखवला आहे. गेल्या दशकात केलेल्या विकासकामांची ही पावती असून, सकारात्मक बदलासाठी जनतेने दिलेला हा पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.
\n\n\nAssam blesses BJP-NDA once again!
\nThe BJP-NDA’s win in the Assam Vidhan Sabha elections illustrates the unwavering support for our Alliance’s emphasis on development and bringing a positive difference in people’s lives. I thank my sisters and brothers of Assam for the…
\n— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2026
पुद्दुचेरीमध्येही सुशासनाचा विजय –
\n
\nपुद्दुचेरीच्या निकालावर समाधान व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी एन. रंगासामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक केले. सुशासनाच्या रेकॉर्डमुळेच जनतेने एनडीएला पुन्हा एकदा संधी दिली असून, विकासाचा हा वेग अधिक तीव्र केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.