Kalyan Dombivli Municipal Election | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल शेवटची तारीख होती. मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांची निराशा झाली. तर काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली. एकीकडे असे चित्र असताना भाजपने मतदान होण्याआधीच खातं उघडलं आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या विजयचा नारळ फुटला असून भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी विजयी झाल्या आहेत. त्यानंतर आता सलग दुसरा उमेदवार विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपने दोन जागांवर मतदानापूर्वीच ‘कमळ’ फुलवलं आहे. आसावारी नवरे यांची बिनविरोध निवड कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 26 क मधून भारतीय जनता पक्षाच्या आसावारी नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत भाजपने खातं उघडत दुसरा विजय मिळवला आहे. एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र आज कागदपत्रांची तपासणी होऊन त्यांच्या दस्तावेजांची पडताळणी नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. Kalyan Dombivli Municipal Election | पहिला विजय रेखा चौधरींचा यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची निवड झाल्याने पहिला विजय मिळाल्याची माहिती समोर आली होती. कल्याण पूर्वेतील 18 अ प्रभागात भाजपच्या रेखा राजन चौधरी या जवळपास बिनविरोध झाल्या. 18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी याचा एकच अर्ज आल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. Kalyan Dombivli Municipal Election | दरम्यान, निवडणुकीच्या आधीच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे दिसत आहे. भाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे यांचा बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे भाजपामध्ये उत्साहाचे जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्याची आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे. हेही वाचा: खोपोली पोलीस ठाण्यावर कॅन्डल मार्च; उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी