नेवासा | न्यायालयासमोरील वकीलबार जवळ लावलेल्या वकीलाच्याच दुचाकीची झाली चोरी

नेवासा – नेवासा पोलीसांकडून शहरासह परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचा तपास लागत नसल्यामुळे चोरट्यांची मानसिकत्ता आता दिवसेंदिवस वाढत चाललेली असून चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे.
याचाच फटका नेवासा न्यायालयात वकीली व्यवसाय करणाऱ्या एका विधिज्ञालाच बसलेला असून नेवासा न्यायालयाच्या आवारातील बारसमोर लावलेल्या एका वकीलाचीच दुचाकी चोरी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्यामुळे नेवासा वकील संघातून पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी पसरली अाहे नेवासा न्यायालयाच्या आवारातूनच वकीलाच्या झालेल्या दुचाकी चोरीचा घटनेमुळे वकील संघातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या दुचाकीचा तातडीने तपास लावण्याची मागणी यावेळी वकील संघाने केली आहे.
नेवासा न्यायालयात वकीली व्यावसाय करणारे विधीज्ञ विजय हस्तीमल चंगेडे (वय ५९) रा.गणपती चौक नेवासा खुर्द यांची एचएफ डिलक्स कंपनीची दुचाकी (क्रमांक एम.एच.१७ ए.एक्स १५९२) ही दुचाकी घेवून शनिवारी (दि.२१) रोजी सकाळी ११ वाजता विधिज्ञ विजय चंगेडे आणि त्यांचे चिरंजीव आनंद हे नेवासा न्यायालयात आले असता त्यांनी त्यांची ही दुचाकी न्यायालयासमोरील वकीलबार कार्यालयासमोर लावून ते त्यांचे दैनंदिन कामकाज करत असतांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा आनंद चंगेडे हा मोटारसायकल घेवून नेवासा येथे जेवणासाठी गेला व पुन्हा तीन वाजेच्या सुमारास न्यायालयाकडे आला असता.
पुन्हा आपली दुचाकी वकील बार समोर लावून न्यायालयाकडे गेला पुन्हा विधिज्ञ विजय चंगेडे यांचे कामकाज आटोपल्यानंतर ते पुन्हा चार वाजेच्या दरम्यान वकील बारकडे लावलेल्या दुचाकीकडे आले असता त्यांना त्यांची लावलेली ही दुचाकी दिसली नाही म्हणून विधिज्ञ चंगेडे आणि मुलगा आनंद आणि न्यायालयासमोर असलेले विधिज्ञ कल्याण पिसाळ, अभिजीत पाटील,नितीन मते यांनी या मोटारसायकलचा कोर्ट परिसरात शोध घेतला परंतू त्यांना ही दुचाकी मिळून आलेली नसल्यामुळे विधिज्ञ चंगेडे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा न्यायालयाजवळ असलेल्या वकीलबार कार्यालयासमोर विधिज्ञ विजय हस्तीमल चंगेडे यांच्या दुचाकी मोटारसायकलची चोरी झाल्यामुळे नेवासा पोलिसांच्या निष्क्रिय कारभाराचा प्रताप चक्क वकीलांवरच गुदरलेला असून चोरटे थेट न्यायालयाच्या आवारातही आता चोरी करु लागल्यामुळे पोलीसांचा धाक आणि दराराच आता संपुष्ठात आल्याची जोरदार चर्चा न्यायालय परिसरात जोरदारपणे चर्चेली जात होती.





