मनसेच्या मोर्चाने मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडणार

कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा
मुंबई : बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात मनसेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

या मार्चावरून कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोडवरून मोर्चा काढण्याची प्रयत्न करून मनसे मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका वस्त्रोद्योग व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलवून लावण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 9 फेब्रुवारीला मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांची महत्वाची बैठक बोलावली होती. हा मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पाडावा अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मोर्चातील मार्गावरून आता कॉंग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख आक्रमक झाले असून, त्यांनी मनसेवर टीका केली आहे. मोहम्मद अली रोडवरून मोर्चा काढण्याची मनसेची मागणी म्हणजे मृतावस्थेत आलेल्या पक्षाला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे अस्लम शेख म्हणालेत. तसेच मनसे जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असल्याraj thakaryचा आरोप अस्लम शेख यांनी केला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.