मुंबईचा राजा गणेशगल्लीतून निघाला ! विसर्जन मिरवणुकीला सुरुवात ; लालबागचा राजा थोड्याच वेळात निघणार

Ganpati visarjan 2025। अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आज विसर्जन होणार आहे. अनंत चतुदर्शीला मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि अन्य परिसरात हजारो सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.
मुंबईचा राजा मंडपातून निघाला आहे. विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळख मुंबईचा राजा ओळखला जातो. मुंबई राजा मंडपातून निघाल्यानंतर लालबाग परिसरातील गणपती विसर्जनासाठी निघणार आहे.
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन सोहळ्याच्या पोलीस बंदोबस्तासाठी यावर्षी प्रथमच एआय तंत्रज्ञान उपयोगात आणला जाईल. मुंबईतील 6500 सार्वजनिक मंडळे व दीड लाख गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका आज निघणार आहेत.
विसर्जन मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असून गर्दीच्या ठिकाणी एकूण 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांनीही विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येईल. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांच्या विसर्जन मिरवणुका आकर्षणाचा विषय असतील.





