नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी-वढेरा यांचा सध्या चर्चेत असलेला लोधी इस्टेट, 35 नंबरचा सरकारी बंगल्याची चावी भाजपचे राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांच्याकडे दिली जाणार आहे.
प्रियांका यांना हा 6बी टाइप बंगला सरकारने खाली करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बंगला खाली झाल्यावर येथे कुणाची वर्णी लागणार याविषयीही चर्चा रंगली होती. अर्थातच, अपेक्षेप्रमाणे हा बंगला भाजप नेत्याकडे देण्यात आला आहे.
बलुनी सध्या राहत असलेला रकाब गंज रोडवरील 20 नंबरचा हरद्वार हा बंगला सोडणार आहेत. हा बंगला सुद्धा 6बी टाइपचाच आहे. त्यामुळे आता हा बंगला कुणाला मिळणार याविषयीही चर्चा रंगणार आहे. पुन्हा अपेक्षेप्रमाणे हा बंगलाही भाजप नेत्यालाच मिळणार अशी शक्यता अधिक आहे.