नवी दिल्ली – ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चार महिलांचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते, असे दाखवण्यात आले आहे. यावरून अनेकांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाला काही जण विरोध करत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटाला काही प्रेक्षकांचा आणि राजकीय नेत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. अश्यातच, आता पश्चिम बंगाल सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेत द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घातलीये. पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय ऐकून अनेकांना मोठा धक्का बसलाय. एकेकडे प्रेक्षक या चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद देताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये चित्रपटावर थेट बंदी घातली जात असल्याचं दिसत आहे. यापूर्वी तामिळनाडू राज्यात सुद्धा या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. आणि आता पश्चिम बंगालमध्ये हा चित्रपट बॅन करण्यात आला आहे. दरम्यान, द केरळ स्टोरी या चित्रपटाने पहिल्या दिवशी बाॅक्स आॅफिसवर 8.3 कोटींचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी 11.22 कोटींचे कलेक्शन केले आणि तिसऱ्या दिवशी 16.60 कोटींचे कलेक्शन केले. विशेष म्हणजे सोशल मीडियावर लोक पोस्ट शेअर करत द केरळ स्टोरी या चित्रपटाला सपोर्ट करताना दिसत आहेत. लोक द कश्मीर फाईल्स आणि द केरळ स्टोरी या चित्रपटांची तुलना का करत आहेत.