उशिराने दिलेला न्याय अन्याय वाटतो, दिशा कायदा लवकर आणावा – रुपाली चाकणकर
Updated On:

राज्य सरकारने लवकरच राज्यात दिशा कायदा आणावा
पुणे: निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी देण्यात आली. यातून निर्भया व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला याचे समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी आज व्यक्त केली.
अशा घटना घडू नये यासाठी समाजाचे प्रबोधन होणे गरजचे आहे. अशा प्रकारे उशिराने दिलेला न्यायदेखील कधी कधी अन्याय वाटतो. त्यामुळे राज्य सरकारने दिशा कायदा राज्यात लवकर आणला पाहिजे व सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा आणावा. अशी मागणी रुपालीताई चाकणकर यांनी केली.





