ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचा प्रश्न ऐरणीवर

लंडन – ब्रिटनमध्ये २०२३ मध्ये उच्चांकी ९ लाख ६ हजार परदेशी नागरिकांनी स्थलांतर केल असून ते २०२२ पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ब्रिटनच्या स्थलांतर धोरणामध्ये दुरुस्ती करून योग्य निर्णय घेतले जातील, असे ब्रिटनचे पंतप्रधान स्टीर कारमर यांनी जाहीर केल आहे.
ब्रिटनच्या राष्ट्रीय सांखिकी कार्यालयाच्या संशोधन अहवालानुसार जून २०२४ पर्यंत ब्रिटनमध्ये सुमारे १२ लाख स्थलांतरित नागरिक आले आणि 4 लाख ७९ हजार नागरिकांनी ब्रिटन देश सोडला. त्यामुळे स्थलांतरितांमध्ये प्रत्यक्षात जून २०२३ ते जून २०२४ या वर्षात २० टक्क्यांची घट झाली असून ते ७ लाख ४० हजार आहेत.
मात्र २०२० च्या बेक्झिटनंतर स्थलांतरितांचा आणि सीमा सुरक्षेचा प्रश्न तिथ ऐरणीवर आला असून, यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रश्नावरून कंझर्वेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या सरकारला पायउतार व्हावे लागले होते आणि स्थलांतरितांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणाऱ्या लेबर पार्टीला विजय मिळाला होता. लेबर पार्टीचे सध्याचे पंतप्रधान स्टीर कारमर यांनी हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे .





