- संचारबंदीमुळे ऑनलाइनवर भर
- भाजीपाला, औषधांची मागणी, बॅंकिंग व्यवहारासाठी वापर
पिंपरी – “करोना’मुळे सुरु झालेल्या दीर्घकालीन संचारबंदीने नागरिकांना बहुतांश व्यवहार ऑनलाइन आणि घरी बसून करण्यास भाग पाडले आहे. घऱपोहच भाजीपाल, साहित्य पुरवठा, औषधे, तक्रारी माहिती, गॅसचे बुकींग व बॅंकिग व्यवहार अशा प्रकारच्या गोष्टी मोबाईल व संगणकीय इंटरनेटद्वारे केल्या जात आहेत. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही स्तरावर अशाप्रकारचा ऑनलाईन व्यवहार कित्येक पटीने वाढला आहे.
आधुनिक युगातही प्रत्यक्ष बाजारत जाऊन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. तरुण पिढीमार्फत ऑनालईन पद्धतीने वस्तू घरी मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही संचारबंदीत आता कंपन्याचे व्यवहार बंद आहेत. सेवाही ठप्प आहेत. बाजार व सर्व प्रकारचे व्यवहार थांबले आहेत. अशावेळी घरात बसूनच सर्व गोष्टींची तजवीज कशी करायची असा प्रश्न संचारबंदीच्या सुरुवातीच्या दिवसात नागरिकांना सतावत होता.आता ऑनलाईन व्यवहारांनीच त्यासाठीच मार्ग शोधून दिला आहे. घरपोच सेवा सुरु झाल्यानंतर त्यांची मागणी ऑनलाईन म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून नोंदविली जाते. त्यानंतर घरपोच सेवा पुरविण्यात येते.
भाजीपाला, किराणा माल, औषधे अशा अत्यावश्यक गोष्टींकरिता ऑनलाईन व घरपोच सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे याचा लाभ आता नागरिक घेत आहेत. बॅंकिंगचे व्यवहारही ऑनलाईन आहेत. पैसे काढणे, दुसऱ्याच्या खात्यावर जमा करणे, खात्याचे स्टेटमेट तपासणे अशा अनेक गोष्टी करता येत आहेत.
कार्यालयीन कामासाठी वापर
कार्यालयीन कामे घरातून (वर्क फ्रॉम होम) करुन देण्याची पद्धतही संचारबंदीने सुरु झाली आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय , खासगी कंपन्यांची कामे आता घरात बसून ऑनलाईन पद्धतीने केली जात आहेत. त्यासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. मेल, व्हॉटस अप व अन्य सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑलाईन पद्धतीने काम सुरु आहे.
संगीत शिक्षण ऑनलाइन
काही खासगी क्लासेस, संगीत विद्यालयांकडून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. अनेक खासगी क्लासेस व्हिडिओ कॉन्फ्रेसच्या माध्यमातून सुरु आहेत. त्या माध्यमातून घरबसल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षाही क्लासेसवाले ऑनलाईन पद्धतीने घेत आहेत.
रक्ताचे रिपोर्टही ऑनलाईन मिळतील
शहरातील काही रक्त तपासणी प्रयोगशाळामार्फत ऑनालाईन तपासणी अहवाल नागरिकांना दिले जात आहेत. अत्यावश्यक बाब म्हणून प्रयोगशाळेतील डॉक्टर घरी येऊन रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेऊन जातात. त्यानंतर त्यांना तुमचे रक्ताचे रिपोर्ट ऑनलाईन मिळतील असे सांगितले जाते.