आजपासून थंडीची तीव्रता कमी होणार; नागपूर वेधशाळेचा अंदाज
Updated On:

मुंबई – नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा बुधवारी 1 ते 2 अंशाने वाढला. कमी दाबाचे हे क्षेत्र आज गुरुवारपर्यंत (दि.19) तामिळनाडूसह आंध्र प्रदेशाकडे सरकणार असून राज्यात गुरुवारपासून पाच दिवस हवामान कोरडे रहाण्याची शक्यता आहे.
किमान तापमान 3 ते 4 अंशाने वाढून थंडीची तीव्रता कमी होण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून मध्य महाराष्ट्रात धुके पडण्याचा अंदाज आहे.





