Pimpri : साते येथे दिक्षारंभ सोहळा उत्साहात

चांदखेड : साते येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात सोमवारी (दि. ८) दिक्षारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शिवाजीनगर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे आणि उपकमांडंट आशिष राजन हे उपस्थित होते.
विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी करत नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले. न्यायालयीन कामकाजाची माहिती देताना त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायसंस्थेची भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट केली.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे विभागप्रमुख प्रियांक राणा, शाखाप्रमुख प्रदीपकुमार यादव, पुलकित आगरवाल, विष्णु नमन, प्रसन्न रामतीर्थ यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक आणि सुमारे ३,००० विद्यार्थी उपस्थित होते.





