आॅस्ट्रेलियाच्या संघाला भारतीय संघ पराभूत करेल
Updated On:

सातारा – क्रिकेटच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतील विजयानंतर आॅस्ट्रेलियन संघाने केलेला उन्माद निंदनीय आहे. आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या या वर्तनाचा बदला भारतीय संघ त्यांना खेळातून पराभूत करत घेईल, असे मत धनी घोडके यांनी व्यक्त केले. त्यामुळेच सध्या सुरु असलेल्या टी ट्वेंटी स्पर्धेतील सर्व सामन्यांत आॅस्ट्रेलियाचा भारत पराभव करेल, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत ते बोलत होते. एखादा विजय मिळवल्यावर खेळाडू असा करंडक डोक्यावर घेतात. मात्र, या आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अपमानस्पद कृती केली, याचा धिक्कार करत असल्याचे घोडके यांनी सांगितले. त्याचबरोबर भारतीय संघ त्यांना पराभूत करून त्यांच्या या कृतीचा बदला घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.





