मेलबर्न – माझ्याविरोधात जर शॉर्टपीच बॉल टाकण्याचा प्लॅन करणार असाल तर मला त्याची भीती नाही. पण तुम्ही करत असलेल्या प्लॅनचा काहीही फायदा होणार नाही, असे म्हणत स्टीव्ह स्मिथने भारतीय भारतीय गोलंदाजांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
स्टीव्ह स्मिथ म्हणाला, माझ्या जीवनात मी एवढ्या शॉर्टपीच बॉलचा सामना केला आहे की आता मला कसलीही चिंता वाटत नाही. भारतीय गोलंदाज जर माझ्याविरोधात शॉर्टपीच बॉल टाकून मला आऊट करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट भारतीय संघाला त्याचा तोटाच होईल, असे तो म्हणाला.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध खेळताना स्टीव्ह स्मिथला नील वॅगनरने 4 वेळा शॉर्टपीच बॉलवर बळीचा बकरा बनवले होते. यावर स्मिथ म्हणाला, वॅगनर एक वेगळ्या दर्जाचा गोलंदाज आहे. त्याची पुनरावृत्ती भारतीय गोलंदाजांनी केल्यास त्यांना पस्तावे लागेल. त्याच्यासारखी गोलंदाजी करणे भारतीय गोलंदाजांना जमणार नाही. तो उत्कृष्ट गोलंदाज असल्याचे स्मिथने स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात नेहमीच तीव्र स्पर्धा राहिली आहे. विराट एक सर्वोत्तम खेळाडू आहे, त्यामुळे नक्कीच त्याच्या विरुद्ध खेळताना संघाचे मनोबल आणि जिद्द वाढते. मला विराट कोहलीबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. पण तो माझ्यासाठी अन्य खेळाडूंप्रमाणेच आहे. तसेच ही मोठी मालिका असेल. त्यांनी मागील वेळी आम्हाला पराभूत केले होते.
– टीम पेन, कर्णधार, ऑस्ट्रेलिया