नवी दिल्ली – भारतात अगरबत्त्या मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात आणि त्याची निर्यातही केली जाते. भारत या क्षेत्रात सर्वात आघाडीवर असून ही बाजारपेठ 8,000 कोटी रुपयांची असल्याची समजले जाते. ही बाजारपेठ अबाधीत राहावी आणि वाढावी यासाठी या क्षेत्रात दर्जाचे नवे मानदंड ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड लागू करणार आहे. अगरबत्ती सुरक्षित रहाव्यात, घरातील हवेचा दर्जा बिघडू नये, पर्यावरण संतुलन बिघडू नये या दृष्टिकोनातून हे नवे मानदंड निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे अगरबत्ती तयार करणार्या कारखान्यांना विशिष्ट कच्चा माल वापरावा लागणार आहे. अगरबत्ती उद्योग अमेरिका, मलेशिया, नायजेरिया, ब्राझील, मेक्सिको या देशांना बर्याच प्रमाणात निर्यात करतो. ही निर्यात वाढविण्यासाठी दर्जा वाढविल्यामुळे मदत होणार आहे