#NisargaCyclone : उद्या आणि परवा वादळाचा प्रभाव जास्त

पुणे (प्रतिनिधी): निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव भारत भूमीवर तीन ते सहा जून या कालावधी पर्यत राहणार आहे. या दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस बरसणार आहे.त्यातील सर्वात जास्त फटका हा महाराष्ट्राला बसणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रात या वादळाचा सर्वाधिक प्रभाव हा तीन व चार जून दरम्यान राहणार आहे. या दरम्यान अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.त्यामुळे पुरस्थिती सुद्धा निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
या वादळातील वाऱ्याचा वेग हा 100 ते 110 किलोमीटर इतका आहे.वादळाचे जे टप्पे असतात त्यानुसार हे सौम्य वादळ असणार आहे,वाऱ्याचा वेग जरी कमी असला तरी वादळामुळे एकत्रित झालेले बाष्प हे मोठ्या संख्येने असल्याने अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज अधिक आहे. मान्सूनचे सर्व ढग एकत्रित झाल्याने त्याचा परिणाम अधिक होणार आहे.
महाराष्ट्रातून या चक्रीवादळाची वेळ, तीव्रता आणि दिशे नुसार खालील मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे.
(खाली दिलेल्या वेळेला चक्रीवादळाचा केंद्रबिंदू त्या त्या गावाजवळून मार्गक्रमण करू शकते)
3 जून दुपारी 4 मुंबई अलिबाग किनारपट्टी वरून वरळी मार्गे
3 जून रात्री 8 ठाणे पाचवड वरून भिवंडी, उम्बरपाडा,वाडा मार्गे
4 जुन पहाटे 1 खोडाला, इगतपुरी वरून त्रिंबकेश्वर, हरसुल,कपराडा मार्गे
4 जुन पहाटे 2 वणी सापुतारा वरून अभोणा ,कळवण ,सटाणा ,नागपूर मार्गे
4 जुन पहाटे 4 साक्री म्हसदी वरून लामकानी,चिमठाणे मार्गे
4 जुन सकाळी 8 वर्शी ,थाळनेर वरून लामकानी,चिमठाणे मार्गे
4 जुन सकाळी 9 शिंदखेडा,जैतपूर वरून शिरपूर ,सुळे मार्गे
4 जून सकाळी 10 खरगोण (मध्य प्रदेश)
आपले गाव वरील ठिकाणांपासून 150 ते200 किमीच्या आत असल्यास आपल्याकडेही 3 जुनच्या पहाटेपासून 6 जून च्या सायंकाळ पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे





