पुणे : महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे आज काळाची गरज असून काॅग्रेसचे उमेदवार याच प्रेरणेने काम करतील असे मत माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे निमित्त साधत फुले वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून काॅंग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग २२ काशेवाडी- डायस प्लॉटचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जुबेरबाबू शेख, विठ्ठल थोरात, तारक शेख, राजू शेख, पप्पू परदेशी, जावेद शेख, आरिफ शेख, उफक शेख, समिर शेख, सुरेखा खंडाळे, दीपक गायकवाड, सुरेश व्यास, सुंदरम, अरुण गायकवाड यांच्यासह काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते महिला, युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.