Rasika Sunil : नवऱ्याने केली ‘ती’ कृती अन् रसिका सुनीलला अश्रू अनावर! अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

Updated On:
Rasika Sunil : नवऱ्याने केली ‘ती’ कृती अन् रसिका सुनीलला अश्रू अनावर! अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

झी मराठी या वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या मालिकेतील शनाया हे पात्र साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील हि घरोघरी पोहचली. तिने या मालिकेत साकारलेली खलनायकाची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. रसिका हि सतत तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट व्हिडिओ शेअर करत असते. पण यावेळी रसिकाने तिच्या नवऱ्याने अशी काही कृती केली त्यामुळे ती भावूक झाली आहे. याची पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केली आहे.

रसिका ज्या श्वानाला भाऊ मानते त्याचा आज वाढदिवस आहे. या श्वानाचे नाव रश असून रसिकाच्या नवऱ्याने रशसारखाच बर्फाचा श्वान करून अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नवऱ्याची ही कृती पाहून रसिकाला अश्रू अनावर झाले. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आमच्या लहान बाळासाठी आमचं हे प्रेम अतुलनीय आहे. आदित्य हा व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना तुझी परवानगी घेतली नाही, यासाठी सॉरी. आज ‘रश’चा वाढदिवस आहे. ‘रश’ हे आमचं बाळ आहे, असे रसिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे. तिने शिअर केलेल्या व्हिडिओला इतर कलाकार मंडळी आणि चाहते भरभरून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. रसिका नेहमी ‘रश’बरोबरचे तिचे सुंदर फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. रसिकाच्या ‘रश’ नावाच्या या श्वानाला आता चार वर्षे झाली आहेत.

ती भारतात अन् तो अमेरिकेत

२०२१ मध्ये अभिनेत्री रसिका सुनील आणि आदित्य बिलागीशी याच्याशी लग्नबंधनात अडकली. या दोघांचे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दोघांनी एकमेकांना काही वर्ष डेट केल्यानंतर गोव्यात मोठ्या थाटात त्यांनी लग्न केले. तिचा नवरा आदित्य अमेरिकेतील एका कंपनीत जॅाबला आहे. सध्या रसिका भारतात तर आदित्य अमेरिकेत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

2026-09-08 19:55:45

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

Pooja Sawant Adhir Man Zhale Song : "दोन दिवस अंगावर होती ओली साडी..."; 'अधीर मन झाले' गाण्याचा पूजा सावंतने सांगितला खास किस्सा

2026-09-08 14:47:26

Pooja Sawant Adhir Man Zhale Song : "दोन दिवस अंगावर होती ओली साडी..."; 'अधीर मन झाले' गाण्याचा पूजा सावंतने सांगितला खास किस्सा

Siddharth Jadhav : 'एवढी कसली घाई?' सिद्धार्थ जाधवने 'ती' बातमी पाहताच केली ठणठणीत पोस्ट

2026-08-25 11:40:22

Siddharth Jadhav : 'एवढी कसली घाई?' सिद्धार्थ जाधवने 'ती' बातमी पाहताच केली ठणठणीत पोस्ट

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची राजस्थानला बदली झाली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; मुंढेंनीच सांगितलं सत्य

2026-08-20 21:38:28

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची राजस्थानला बदली झाली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; मुंढेंनीच सांगितलं सत्य

Ashok Saraf : "एकाने माझा पॉकेट मारला. मी रिक्षात बसलो तेव्हा...."; अशोकमामांनी सांगितला 'तो' जुना किस्सा, दादा कोंडके यांच्याविषयी म्हणाले...

2026-08-20 08:09:15

Ashok Saraf : "एकाने माझा पॉकेट मारला. मी रिक्षात बसलो तेव्हा...."; अशोकमामांनी सांगितला 'तो' जुना किस्सा, दादा कोंडके यांच्याविषयी म्हणाले...