हैद्राबाद – हैद्राबाद शहराची ओळख बनलेला इस्लामिक वास्तुकला म्हणजेच चारमिनारचा काही भाग कोसळला असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. १६ व्या शतकातील या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरु होते.
दरम्यान, या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. पुरातत्व विभागाचे अधिकारी या भागाचा दौरा करणार असून याप्रकरणी तपास करणार आहेत.
Telangana: A portion of one of the pillars of the historic monument Charminar in Hyderabad, got damaged yesterday. No injuries reported. pic.twitter.com/ugzX8GDBdZ
— ANI (@ANI) May 2, 2019