बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याच्या “क्रिश-4′ चित्रपटाची दिर्घ काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन हे स्क्रिप्टला अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहे. या चित्रपटात विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत भव्य सीन शूट करण्यात येणार आहे. हृतिक रोशन या चित्रपटात 4 भूमिका साकारणार अशी प्रारंभी चर्चा करण्यात येत होती. मात्र, आता तो 3 भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
यात हृतिक रोशन हा सुपरहीरो बनणार आहे. यासोबतच तो व्हिलनची भूमिका साकारणार आहे. म्हणजेच या चित्रपटात हृतिक विरोधात हृतिक असा संघर्ष चाहत्यांना अनुभवास मिळणार आहे. तसेच चित्रपटात रोहितचे पुनरागमन होणार असून पुन्हा एकदा ही भूमिका हृतिक रोशन साकारणार आहे. या चित्रपटात चाहत्यांना जादूही पाहावयास मिळणार आहे.
View this post on Instagram
विशेषता, जे मुलांमध्ये खूपच पॉपुलर झाले होते. यामुळेच हे पात्र पुन्हा चाहत्यांसमोर आणण्यात आले आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन करणार आहे की नाही हे अद्याप अनिश्चित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दोन जण करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षाअखेर होण्याची शक्यता आहे.