Khamgaon News : विकृतीचा कळस..! गाय चोरीच्या संशयातून तरुणाला अमानुष मारहाण; फोटो अन् व्हिडीओ काढले, बुलढाण्यात खळबळ

Updated On:
Khamgaon News : विकृतीचा कळस..! गाय चोरीच्या संशयातून तरुणाला अमानुष मारहाण; फोटो अन् व्हिडीओ काढले, बुलढाण्यात खळबळ

Khamgaon News : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातून माणुकीला काळीमा फासणारी धक्कादाक बातमी समोर आली आहे. खामगाव बस स्थानकाच्या परिसरातून एका २४ वर्षीय तरुणाचे गाय चोरीच्या संशयावरून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला अमानुष मारहाण केली. विकृतीचा कळस म्हणजे या तरूणाला नग्न करून त्याचे व्हिडीओ व फोटो शूट करण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचे नाव रोहन पैठणकर आहे. तो हॅाटेलमध्ये वेटरचे काम करतो. बुधवारी रात्री ही घटना घडली. या तरुणाचे अपहरण करण्यात आले. बस स्थानकाजवळील मैदानात त्याला नेण्यात आले आणि तिथे त्याला जात व धर्म विचारत बेदम मारहाण करण्यात आली.

त्यानंतर त्याचे कपडे उतरवून नग्न अवस्थेत गायींसोबतचे त्याचे व्हिडिओ व फोटो काढण्यात आले. यानंतर आरोपींनी त्याच्यावर काही अंतरावर नेऊन तिथे अत्याचार केले. मात्र, गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या व्हॅनचा सायरन ऐकून आरोपींनी तिथूळ पळ काढला. तरुणाला करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. नाकाचे हाड मोडले आहे. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनंतर आता विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

Pune News : झाडावर गळफास घेण्याचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचविले

2026-10-01 18:21:04

Pune News : झाडावर गळफास घेण्याचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचविले

Pune News : मोबाईल फॉरमॅट केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

2026-10-01 18:16:37

Pune News : मोबाईल फॉरमॅट केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Buldhana News: दुष्काळाची झळ! बुलढाण्यात चाराटंचाईने पशुपालक चिंतेत, दूध उत्पादनात निम्मेपेक्षा अधिक घट

2026-10-01 12:37:18

Buldhana News: दुष्काळाची झळ! बुलढाण्यात चाराटंचाईने पशुपालक चिंतेत, दूध उत्पादनात निम्मेपेक्षा अधिक घट

Crime News : धक्कादायक..! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

2026-09-25 16:48:48

Crime News : धक्कादायक..! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात