‘या’ राज्याच्या राज्यपालांनी लॉकडाऊनमध्ये लिहिली तब्बल १३ पुस्तके

नवी दिल्ली – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या वेळेचा सदुपयोग करत मिझोरामचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी पुस्तक आणि कविता लिहिल्या आहेत. यादरम्यान त्यांनी तब्बल १३ पुस्तके लिहिली आहे. इंग्रजी आणि मल्याळम भाषांचा संग्रहाचाही समावेश आहे.

यासंदर्भात बोलताना पीएस श्रीधरन पिल्लई म्हणाले कि,  लॉकडाऊनमध्ये राजभवनमध्ये कोणालाही येण्या-जाण्याची परवानगी नव्हती. लोकांसोबत माझा संवादही बंद होता. तसेच आगामी दौरेही स्थगित करण्यात आले होते. यामुळे मला वाचणे आणि लिहिण्यासाठी अधिक वेळ मिळाला. मी सकाळी चार वाजता उठून व्यायाम केल्यानंतर वाचणे आणि लिहणे सुरु केले. नेते आणि कार्यकर्त्यांना नागरिकांना सुशिक्षित करण्यासाठी पुस्तक वाचण्याची सवय असायला पाहिजे.

पुस्तके लिहिण्यासाठी प्रेरणास्रोत कोणते विचारल्यास ते म्हणाले, लहानपणापासून सामान्य जीवन आणि ग्रामीण राजकारणात सक्रिय आहे. वकिली करताना ग्रामीण जनतेशी संवाद साधल्यानंतर आणि नेता बनल्याने मला पुस्तके लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

करोना व्हायरसमुळे जगभरात वाईट परिस्थिती आहे. परंतु, याची एक सकारात्मक बाजूही आहे. या व्हायरसने आपण एकमेकांवर किती निर्भर आहोत हे मनुष्याला शिकवले आणि माणसांमध्ये प्रेम वाढवले, असे मत पिल्ले यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांच्या हस्ते आज पीएस श्रीधरन पिल्लई यांच्या काही पुस्तकांचे आज प्रकाशन करण्यात येणार आहे. पिल्लई यांनी ३० वर्षांआधी लिहिण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले पुस्तक १९८३ मध्ये प्रकशित झाले होते. राज्यपाल बनण्याआधी त्यांची १०५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.