Holi 2023 : “होळी व रंगोत्सव साजरा करताना….” होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसेच धूलिवंदनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! परस्पर प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगांचा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व देशबांधवांमध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट करो. हा सण साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन करतो. pic.twitter.com/c33kWmQX8k
— Governor of Maharashtra (@maha_governor) March 6, 2023
राज्यपाल रमेश बैस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व देशबांधवांमध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट करो, या शुभकामनांसह सर्वांना होळी व धूलिवंदनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/aaps-manish-sisodia-sent-to-judicial-custody-till-march-20/
पुढे राज्यापालांनी होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन देखील केले आहे.





