नवी दिल्ली – देशांतर्गत गुंतवणूकदारांना विविधि राज्य आणि क्षेत्रात गुंतवणुकीची माहिती व्हावी यासंदर्भात माहिती असणारे पोर्टल सरकार विकसित करीत आहे.
आत्मनिर्भर निवेशक मित्र असे या पोर्टल चे नाव आहे. या पोर्टलच्या चाचण्या चालू असून एक मे रोजी हे पोर्टल गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल असे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
विशेष म्हणजे हे पोर्टल प्रादेशिक भाषेबरोबरच मोबाईल ऍपमध्येही उपलब्ध होणार आहे. यामुळे देशांतर्गत गुंतवणूक वाढेल अशी आशा मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
या पोर्टल वरील माहिती दररोज सुधारित करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ,परवाने इत्यादीची माहिती उपलब्ध असेल.