कंगनाचे समर्थन करणाऱ्या विक्रम गोखलेंवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी : सचिन खरात

Updated On:
कंगनाचे समर्थन करणाऱ्या विक्रम गोखलेंवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी : सचिन खरात

मुंबई – 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केलंय. तसच यावेळी त्यांनी हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य देखील केलं. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना आरपीआयचे ( खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी कंगनाचे समर्थन करणाऱ्या विक्रम गोखले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

खरात यांनी म्हटले आहे की,  महाराष्ट्र राज्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे. राज्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणाची आहुती दिली. भारत देश ना हिरव्याचा ना भगव्याचा आहे, ना एका रंगाचा आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाप्रमाणे या देशाचा अशोकचक्र असलेला तिरंगा झेंडा आहे. परंतु तुमच्या सारख्या बाजार बुनग्यांना या जन्मात तरी कळणार नाही अशा प्रतिक्रियाबरोबरच  विक्रम गोखले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आरपीआयचे ( खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी  महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

2026-10-05 18:12:55

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

Vijay Wadettiwar : 'दुष्काळग्रस्त यादीत मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकते माप'; राज्य सरकार राजकीय भेदभाव करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

2026-09-29 19:09:11

Vijay Wadettiwar : 'दुष्काळग्रस्त यादीत मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकते माप'; राज्य सरकार राजकीय भेदभाव करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

Manoj Jarange : मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू.! मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, केला गंभीर आरोप

2026-09-28 16:29:45

Manoj Jarange : मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू.! मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, केला गंभीर आरोप

Uday Samant: दुष्काळाचं संकट भयावह ; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम ; उदय सामंतांचा बळीराजाला विश्वास

2026-09-26 14:58:15

Uday Samant: दुष्काळाचं संकट भयावह ; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम ; उदय सामंतांचा बळीराजाला विश्वास

Supriya Sule: "लाडकी बहीण योजनेबाबत लपवाछपवी न करता खरी आकडेवारी जारी करा"; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

2026-09-17 11:31:59

Supriya Sule: "लाडकी बहीण योजनेबाबत लपवाछपवी न करता खरी आकडेवारी जारी करा"; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल