नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि खासदार आपला ३० टक्के पगार एका वर्षासाठी देणार आहेत.मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. तसेच २ वर्षासाठी खासदार निधी तहकूब करण्यात आला आहे. हा निर्णय १ एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे.
त्यावर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी खासदार निधी बंद करण्याचा सरकारने पुन्हा विचार करावा; असे ट्विट करून म्हंटले आहे. त्यांनी खासदारांच्या वेतन कपातीचे समर्थन केले आहे. परंतु त्यांनी दोन वर्ष खासदार निधीचे कपात करणे योग्य नसल्याचे म्हंटले आहे.