रांजणगाव गणपती – पिंपरी दुमाला व गणेगाव खालसा शिवारात आज बुधवारी (२ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पिंपरी दुमाला गावचे सोसायटीचे चेअरमन रवींद्र बडदे यांनी केली आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडासह गणेगाव खालसा व पिंपरी दुमाला हद्दीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ऊस, कांदे, केळी, पेरू, मका व नगदी शेत मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने या परिसरातील शेतीचे तात्काळ व त्वरित पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बडदे यांनी केली आहे.