Rohit Pawar Post : राज्यात पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरण वेगळ्या वळणावर गेले आहे. निलेश घायवळला परदेशात जाण्यासाठी देण्यात आलेल्या पासपोर्टवरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या आरोपाला आता रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राम शिंदे यांनी निलेश घायवळला महाविकास आघाडीच्या काळात पासपोर्ट रोहित पवारांनी मिळवून दिला होता, असा गंभीर आरोप केला होता. या आरोपांवर एक्स पोस्टवरून जुने व्हिडीओ शेअर करत बंदकीपासून ते पासपोर्टपर्यंत सविस्तर भाष्य रोहित पवारांनी केले आहे. तसेच रोहित पवारांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. मा. प्रा. राम शिंदे सर, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं, एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. घायवळ देशाबाहेर आहे, आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात म्हणून कदाचित अहिल्यानगर SP साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते आपण नक्की बघा. असे रोहित पवार म्हणाले. मा. प्रा. राम शिंदे सर, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं, एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. घायवळ देशाबाहेर आहे, आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात म्हणून कदाचित अहिल्यानगर SP साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते आपण… pic.twitter.com/Fpf1BL967x — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2025 पासपोर्ट २०२० साली मिळाला तेंव्हा केंद्रात भाजपचं सरकार होतं याचा विसर पडला का? ज्यांना आपण राजरोसपणे विधीमंडळात घेऊन फिरलात, निवडणुकीत स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघात फिरवलंत, जे जाहीरपणे आपले चरणस्पर्श करतात, ज्यांची जाहिरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देतात त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? मग दूरदूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे, असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला? असे सवाल रोहित पावारांनी राम शिंदे यांना केले आहेत. “सरकार तुमचं आहे, तर मग….” आता प्रकरण अंगलट आल्याने गोल गोल फिरवण्यापेक्षा घायवळने तुमचा प्रचार केला की नाही? तुमच्या बहुतांश सभांमध्ये घायवळने भाषणं केली की नाही? मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही? ते सांगा. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे पासपोर्ट कुणी दिला, बंदूक परवान्यासाठी कुणी शिफारस केली या सगळ्याची तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणा. सरकार तुमचं आहे, तर मग घाबरता कशाला? असे आव्हानच रोहित पवारांनी एक्स पोस्टवरून राम शिंदेंना दिले आहे. हेही वाचा : मुंबईतील बैठकीत काय चर्चा झाली? आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केली भूमिका; नोटीशीच्या प्रश्नावर थेटच बोलले…