खेळाडूंच्या गुणविकासाचे ध्येय; पुनीत बालन व केदार जाधव यांच्या अकादमीची घोषणा

Updated On:
खेळाडूंच्या गुणविकासाचे ध्येय; पुनीत बालन व केदार जाधव यांच्या अकादमीची घोषणा

पुणे – पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन पुनीत बालन आणि भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी एकत्रितरित्या पुनीत बालन – केदार जाधव क्रिकेट अकादमीची पुणे शहरात सुरुवात करत असल्याची घोषणा बुधवारी केली.

याबाबत अधिक माहिती देताना पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन पुनीत बालन आणि क्रिकेटपटू केदार जाधव यांनी सांगितले की, पुणे शहराला क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा आहे. या शहराने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू निर्माण केले आहेत. पुण्यातील युवा आणि गुणवान खेळाडूंना आपल्या गुणकौशल्याचा विकास करून त्यांना आपली कारकीर्द घडवण्याच्या हेतूने या अकादमीची सुरुवात करण्यात येत आहे. ही अकादमी सध्या कोथरूड येथे सुरू असून पुनीत बालन ग्रुपने या अकादमीला सक्रिय पाठिंबा दिला असून पुनीत बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.

पुनीत बालन यांनी सांगितले की, पुनीत बालन ग्रुप आणि क्रिकेट याचा फार जवळचा संबंध आहे. पुण्यातील क्रिकेट क्षेत्रामध्ये पुनीत बालन ग्रुपच्या वतीने 12, 14 आणि 17 वर्षाखालील मुलांसाठी, मुलींसाठी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील खेळाडूंसाठी अनेक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. आणि आता पुनीत बालन ग्रुपच्यावतीने क्रिकेटची अकादमी सुरू करण्यात येणार आहे. तसेच सायकलिंग, तायक्वांदो, शूटिंग, खो-खो, लॉन टेनिस, हॅंडबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस या क्रीडाप्रकारातील खेळाडूंना आर्थिक पाठिंबा दिला जातो.

नामांकित प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय सुविधा

नामांकित प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना मार्गदर्शन करणे. विविध प्रकारचे ट्रेनिंग आणि शारीरिक विकासासाठीचे प्रशिक्षण देणे. 12, 14, 17 तसेच युवा खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळवून देणे हा मुख्य हेतू या अकादमीचा आहे. मुलांसोबतचे मुलींच्या क्रिकेटलाही प्रोत्साहन देणे. याबरोबरच अंध आणि दिव्यांग खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे. आर्थिकदृष्ट्‌या सक्षम नसणाऱ्या आणि गरजू खेळाडूंना पाठिंबा देणे. तसेच स्थानिक खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यांना स्पर्धात्कम विश्‍वाचा अनुभव प्राप्त करून देणे, असेया अकादमीचे उद्दीष्ठ असल्याचे पुनीत बालन आणि केदार जाधव यांनी सांगितले.

 

आणखी संबंधित बातम्या

“महागाई नसावी हे पंतप्रधानांचे ध्येय, लवकरच यावर तोडगा निघेल”; पंकजा मुडेंचे सूचक वक्तव्य

2021-10-19 13:07:19

“महागाई नसावी हे पंतप्रधानांचे ध्येय, लवकरच यावर तोडगा निघेल”; पंकजा मुडेंचे सूचक वक्तव्य

पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

2021-10-06 23:06:14

पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मेस्सीच्या गोलमुळे पीएसजीचा विजय

2021-10-01 07:01:01

मेस्सीच्या गोलमुळे पीएसजीचा विजय

लष्कर भरती पेपर फुटी प्रकरणी अकॅडमीच सूत्रधार!

2021-03-15 08:30:08

लष्कर भरती पेपर फुटी प्रकरणी अकॅडमीच सूत्रधार!

#INDvARG : राणीच्या गोलमुळे भारताची बरोबरी

2021-01-20 22:40:36

#INDvARG : राणीच्या गोलमुळे भारताची बरोबरी