कात्रज बोगद्याजवळील दरीत तरुणीने घेतली उडी

पुणे – कात्रज बोगद्याजवळील दरीमध्ये 22 वर्षीय तरुणीने उडी घेतली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, अंधार असल्यामुळे शोध मोहीम थांबविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एका तरुणाने पोलिसांच्या तक्रार निवारण कक्षाला दूरध्वनीद्वारे ही माहिती रात्री नऊच्या सुमारास कळविली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार अग्निशमन दलाला कळविण्यात आले. दलाचे जवान आणि पोलिसांनी सदर तरुणीचा शोध सुरू केला परंतु, जास्त अंधार असल्याने शोधमोहिमेमध्ये अडथळा येत होता.

त्यामुळे ही शोधमोहिम बुधवारी सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरचा तपास पोलिस निरीक्षक लाड करीत आहेत. ही तरुण धनकवडी परिसरात असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.