पुणे – पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कडक कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मात्र, तरीही शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काही नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही. येरवडा येथील भाजी मंडईतही नागरिकांनी मोठ्या प्रमाण गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आले नव्हते. दरम्यान, या भागात मोठ्या प्रमानात करोना बाधित रुग्णही आढळले असून नागरिकांना त्याचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शहरात करोनामुळे मागील दहा दिवसांपासून सुरू असलेला मृत्यूचा कहर काहीसा कमी झाला आहे. मात्र, दुसरीकडे बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत शहरात 80 नवीन करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता आणखी वाढली आहे.