Heat Wave In Saudi Arabia| यंदा भारतातील काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. सौदी अरेबियातही उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. याचा परिणाम असा झाला की, तब्बल 550 हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यंदा हज यात्रेमध्ये 18 लाख यात्रेकरू सहभागी झाले आहेत. यातील 16 लाख नागरिक परदेशी आहेत. मृतांमधील 323 भाविक हे इजिप्तचे नागरिक होते. तर गर्दीत एका व्यक्तीचा गर्दी चेंगरून मृत्यू झाला आहे. मक्केजवळील अल-मुसाइम येथील रुग्णालयाच्या शवागारातून आलेल्या आकडेवारीनुसार उष्माघाताने 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. तर 2000 हून अधिक भाविकांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता देखील स्थानिक माध्यमांनी वर्तवली आहे. 51.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सौदी राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मक्का येथील ग्रँड मशिदीच्या परिसरात 51.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम हज यात्रेतील नागरिकांवर होत आहे. वाढत्या उष्णेतेमुळे हज व्यवस्थापन समितीने भाविकांना छत्रीचा वापर, जास्तीत जास्त पाणी पिण्याच्या सूचना दिल्या आहेत. Heat Wave In Saudi Arabia| दरम्यान, शनिवारी माऊंट अराफात येथे प्रार्थना आणि अनेक हज विधींसाठी यात्रेकरुंना दुपारच्या उन्हात थांबावं लागलं होतं. अनेक भाविक तासनतास तिथे उभे होते. त्यामुळे अनेकांची प्रकृती खालावली होती. उन्हामुळे येथे लोकांना पाण्याच्या बाटल्या, थंड पेय, आईस्क्रीम आणि चॉकलेट दिले जात आहे. Heat Wave In Saudi Arabia| मक्का येथील पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी सौदी अरेबिया दरवर्षी मोठी व्यवस्था करते, मात्र प्रचंड गर्दी आणि कडक उन्हामुळे हाजी आणि पोलीस अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी, विविध देशांनी किमान 240 यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती, त्यापैकी बहुतेक इंडोनेशियन नागरिक होते. हेही वाचा: अमेरिकन सरकार मोठा निर्णय घेणार ? ; 5 लाख स्थलांतरितांना मिळणार अमेरिकेचं नागरिकत्व