ड्रग्ज प्रकरणी चौघांना 14 ऑक्टोबरपर्यत कोठडी
Updated On:

मुंबई – क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आणखी चार जणांना स्थानिक न्यायालयाने बुधवारी 14 ऑक्टोबरपर्यत एनसीबीची कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील कोठडीत आहे.
गोपाळ आनंद, समीर सहगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा अशी आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांनी ही शिक्षा ठोठाविली आहे. हे सर्व आरोपी क्रूझ जहाजावरील कार्यक्रमाचे आयोजक होते.
चारही आरोपींची कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, गोवा जाणाऱ्या जहाजावर एनसीबीने शनिवारी छापा टाकत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 17 जणांना अटक केली होती.
या कारवाईत 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि 22 एक्स्टसीच्या गोळ्या आणि 1.33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.



