नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मागच्या आठवड्यात ट्विटरकडून बंदी घालण्यात आली होती त्यांचा सह काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह पक्षाचे अधिकृत अकाऊंटही लॉक करण्यात आलं होते. दिवसानंतर एक पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तत्पूर्वी ट्विटर पक्षपाती असल्याचा आरोप गांधी यांनी केला होता.
#WATCH | Andhra Pradesh: GV Sri Raj, a Congress leader & son of former MP, GV Harsha Kumar, cooks “Twitter dish” and says he is sending it to the Headquarters of Twitter India, in protest against the action taken by the social media platform against Rahul Gandhi’s account. pic.twitter.com/1vB3gRisKG
— ANI (@ANI) August 17, 2021
हे प्रकरण ताजे असतानाच आता ट्विटरच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आंध्र प्रदेशात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ट्विटरवर अजब व्हिडियो शेअर केला. या व्हिडियोमध्ये आंध्र प्रदेश काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार जी.व्ही. हर्ष कुमार यांचा मुलगा जी.व्ही. श्रीराजने ‘ट्विटर डिश’ बनवली होती.
हा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडियोवरून काँग्रेस पक्षाला चांगलेच ट्रोल केले आहे. या व्हिडियोत ते म्हणाले की,’राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट लॉक करून चूक केली ट्विटर चूक केली. आमचा मत ट्विटरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचले नाही त्यामुळे आम्ही ट्विटर बर्ड तळून ते गुडगाव आणि दिल्लीतील मुख्यालयात पाठवत आहोत’ असं ही या व्हिडियोमध्ये बोलण्यात आले आहे.
या व्हिडियोचा काँग्रेस पक्षाकडून विरोध केला जात आहे. तसेच ट्विटर बर्ड फ्राय करणाऱ्या जी.व्ही. श्रीराजवर पक्षाकडून कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जीव्ही श्रीराज यांना पक्ष आणि राहुल गांधी यांच्या प्रतिष्ठेचा अपमान आणि कॉंग्रेसची प्रतिमा खराब केल्यामुळे निलंबित केले आहे.