खेड तालुक्‍यात करोनाचा पहिला बळी

राजगुरूनगर -वडगाव पाटोळे (ता. खेड) येथील करोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. खेड तालुक्‍यातील करोना विषाणू संसर्गाचा हा पहिला बळी आहे.

हा 58 वर्षीय करोनाबाधित रुग्ण पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 12 दिवसांपासून उपचार घेत होता. त्याचा रात्री उपचारादारम्यान मृत्यू झाला आहे.

तालुक्‍यात करोना पॉझिटिव्हचे एकूण 28 रुग्ण झाले होते त्यापैकी 5 जण बरे होऊन घरी आले आहेत तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित 22 जणांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. वडगाव येथील ही व्यक्‍ती मुंबई येथून गावी आली होती.

त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी, जावई व कुटुंबातील अजून एक सदस्य याबरोबरच त्यांना घेऊन येणाऱ्या गाडीचा चालक हे सर्वजण पॉझिटिव्ह रुग्ण असून उपचार घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.