मुंबई – अलीकडेच मौनी रॉयने तिच्या घराचे इंटीरियर चाहत्यांना दाखवले. मौनी रॉयने तिच्या लिव्हिंग रूमपासून बाथरूमपर्यंतच्या विडिओ शेअर केले. मौनी पती सूरज नांबियारसोबत संपूर्ण घराची ओळख करून देताना दिसत आहे. यादरम्यान मोनी तिची आणि तिच्या पतीची लव्ह स्टोरीही चाहत्यांना सांगताना दिसली. व्हिडिओमध्ये मोनी म्हणली,’हे आमचे घर आहे. व्हिडीओमध्ये दोघांनीही एकमेकांबद्दल सांगितले की, जेव्हा मौनी सूरज आणि सुजला मौनीला पहिल्यांदा भेटले तेव्हा दोघांचे एकमेकांबद्दलचे मत काय होते. मौनीने सूरजचे कौतुक केले आणि सांगितले की तिला सूरज खूप प्रभावी हुशार आणि अतिशय आकर्षक, बुद्धिमान वाटला. दुसरीकडे सूरजने सांगितले की, मौनीला पाहताच तो तिच्यावर फिदा झाला. या पहिल्याच भेटीत त्याने तीला लग्नासाठी प्रपोज केले होते. मौनी रॉयनेही तिच्या लग्नाबाबतही घर दाखवताना चर्चा केली. तिने सांगितले की, सूरजला लग्नात सर्व विधी खूप महत्वाचे होते. व्हिडिओमध्ये मौनीने तिच्या लिव्हिंग रूमपासून बाथरूमपर्यंत फेरफटका मारला.