PMC Election 2026 | पुण्यातील पहिला निकाल जाहीर झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ, बिबेवाडी येथील चित्र स्पष्ट झाले आहे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षचे तीन उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही एक उमेदवार यशस्वी ठरला आहे. भाजपचे राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले विजयी झाले आहेत. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला. घुले यांच्या विजयामुळे प्रभागात राष्ट्रवादीची उपस्थिती टिकून राहिली.