यवतमाळमध्ये करोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद
Updated On:

मुंबई : एकीकडे राज्यात करोनाने थैमान घातले आहे. त्यातच आतापर्यंत एकही मृत्यू न झालेल्या यवतमाळमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १२५ पर्यंत गेला असून यापैकी ९९ जण बरे होऊन घरी गेले आहे.





