fbpx

‘त्या’ तीन पिल्लांना वाचविण्यात अग्निशामक दलास यश

पिंपरी : सहा फूट अरूंद खोल खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याच्या तीन पिलांना वाचविण्यात अग्निशामक दलास यश आले आहे. ही घटना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील मौनीबाबा आश्रमाजवळ गुरूवारी (दि. ७) सायंकाळी घडली.

दुचाकीला बांधून फरपटत नेत कुत्र्याचा खून केल्याची घटना कासारवाडी येथे घडली. यामुळे प्राणी प्रेमींमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे रस्त्यालगत असलेल्या सहा फूट खोल अरुंद खड्ड्यांमध्ये तीन कुत्र्याची पिल्ले पडली असल्याची माहिती अग्निशामक दलास गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाली.

त्यानुसार प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्राचे प्रदिप काबंळे, परशुराम इसवे, सारगं मगंळरुकर, विकास बोंगाळे, अकुंश बडे, विजय इंगळे हे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्या अरूंद खड्ड्यांमध्ये जाण्यास जागा नसल्याने खड्ड्याभोवतीची थोडी माती उकरली. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान अंकुश बडे हे त्या अरुंद खड्ड्यांमध्ये उतरले. बॅटरीचा प्रकाश झोतात कुत्र्याच्या पिल्लांचा शोध घेऊन तीन पिल्लांना सुखरूपरित्या बाहेर काढले. अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या या कामाचे कौतुक शहरात होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.