रेडा- विश्वासराव रणसिंग यांनी 22 गावांतील शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
म्हसोबाची वाडी (ता. इंदापूर) येथे माध्यमिक विद्यालयात इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक (स्व) विश्वासराव रणसिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भरणे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी रणजित निंबाळकर, श्रीकांत बोडके, पोलीस पाटील, तुषार झेंडे, विनायक चांदगुडे, सुनील खंडाळे, उपसरपंच अजित पवार,हौसीराम चांदगुडे, दत्तात्रय चांदगुडे, बाळासाहेब चांदगुडे, संदीप चांदगुडे, रामदास चव्हाण, मुख्याध्यापक महादेव वणवे, उपस्थित होते.